CWG 2026 – हिंदुस्थानची ग्लासगोमध्ये दिमाखदार झलक; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे किंग चार्ल्स यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्य़ात हिंदुस्थानची दिमाखदार झलक पाहायला मिळाली. ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन यांच्या नेतृत्वाखाली ध्वज आणि बॅटन घेऊन हिंदुस्थानी पथकाने मोठय़ा जल्लोषात प्रवेश केला. या पथकातील पुरुष खेळाडूंनी औपचारिक सूट परिधान केले होते, तर महिला खेळाडू पारंपारिक साडय़ा आणि ब्लेझरमध्ये होत्या.

किंग चार्ल्स तिसरे यांनी यावेळी स्पर्धा सुरू झाल्याची औपचारिक घोषणा केली. यावेळी राणी कॅमिला, ब्रिटिश पंतप्रधान अँडी बर्नहॅम आणि राष्ट्रकुल स्पर्धेचे अध्यक्ष डोनाल्ड रुकारे उपस्थित होते. किंगहॅम पॅलेसमध्ये ‘किंग्ज बॅटन’मध्ये ठेवलेला संदेश यावेळी वाचून दाखवला. या कृतीसह स्पर्धेचा अधिकृत प्रारंभ झाला. ही स्पर्धा 2 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. एखाद्या इनडोअर एरिनामध्ये आयोजित केलेला हा कॉमनवेल्थ गेम्सचा पहिलाच उद्घाटन सोहळा ठरला.

या सोहळय़ामध्ये प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा वारसा जपण्याच आला. त्यामध्ये बरेच कलाप्रकार सादर करण्यात आले. हिंदुस्थानच्या कलाप्रकाराला यावेळी सर्वाधिक दाद मिळाली. हिंदुस्थानच्या खेळाडूंना यावेळी उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. हिंदुस्थानचे खेळाडू जेव्हा सोहळय़ात आपल्या तिरंग्यासह दाखल झाले तेव्हा चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. हिंदुस्थानी खेळाडूंनीही चाहत्यांना अभिवादन केले आणि आपले संस्कार दाखवून दिले.