
एका परदेशी दूतावासाच्या कौन्सल जनरल डेझिग्नेट अधिकाऱ्याच्या फसवणूक प्रकरणी एका संशयिताला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.
तक्रारदार हे कौन्सल जनरल डेझिग्नेट म्हणून काम करतात. गेल्या वर्षी ते दिल्लीहून विमानाने मुंबईत यत असताना, त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करून बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे सांगितले. त्यांच्या क्रेडिट कार्डमधून २ लाख २९ हजार रुपये काढले गेले होते. त्यांच्या ई-मेलवरदेखील पैसे काढल्याचा मेसेज आला होता. या प्रकरणी त्यांनी बँकेत जाऊन तक्रार केली. बँकेने चौकशी केल्यानंतर ती रक्कम त्यांच्या कार्डमध्ये क्रेडिट झाली होती; मात्र ती रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर होत नव्हती.
या प्रकरणी त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली व पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.



























































