इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू, पनवेलमधील हृदयद्रावक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल शहरात सुरू असलेल्या बांधकामांवर पनवेल महापालिकेचे आणि सत्ताधारी भाजपचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे एका 12 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. आसुडगावात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात बुडून या मुलाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या खड्ड्याच्या भोवती बिल्डरने पत्रे लावलेले नव्हते. त्यामुळे हा मुलगा तिथून चालत जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

आसुडगाव येथील गावदेवी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सुरक्षेसाठी या बांधकामाच्या बाजूने पत्रे मारण्यात आलेले आहेत, परंतु तिथे बांधकामासाठी खोदलेला मोठा खड्डा उघडाच आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचलेले आहे. पीयुष हा 12 वर्षीय मुलगा या ठिकाणी आला असता त्याचा तोल गेला आणि तो खड्ड्यात पडला.