
अपघाताचा हॉटस्पॉट ठरलेल्या ठाण्यातील घोडबंदर मार्गावर रविवारी पहाटे मोठा अपघात झाला. मानपाड्याजवळ सुमारे २५ टन वजनाचा भरधाव वेगातील कंटेनर मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या १० फूट खड्ड्यात कोसळला. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली असून टँकरमध्ये अडकलेला चालक अमित यादव याला अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. मेट्रो मार्गातील वाढत्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




























































