पंतप्रधानांनी निवडलेले शिक्षणमंत्री…; प्रियंका गांधींचा प्रल्हाद जोशींवर निशाणा, संसदीय कामकाजातून वक्तव्य वगळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या सरचिटणीस, खासदार प्रियांका गांधी यांनी लोकसभेत पेपरलिक विरोधी सुधारणा विधेयकावर बोलताना विद्यमान शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर निशाणा साधला. ज्या व्यक्तीने गर्भवती महिलेवरील बलात्काराच्या आरोपीच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त करत त्याला अनुमोदन दिले होते, त्याच व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर अध्यक्षांनी संसदीय कामकाजातून हे वक्तव्य वगळले आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधानांनी नवीन शिक्षणमंत्री निवडले आहेत. त्यांनी अशा व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली आहे, ज्याने एका गर्भवती महिलेवरील बलात्कार करणाऱ्यांच्या सुटकेला मान्यता दिली होती.तसेच त्यांच्या सुटकेबाबत आनंद व्यक्त केला होता.

माझा विश्वास आहे की हे सभागृह एक लोकशाही संस्था आहे. येथे बोललेला प्रत्येक शब्द अहवालात समाविष्ट आहे. मी आग्रह करतो की तथ्यांशिवाय अशी विधाने सभागृहात मांडली जाऊ नयेत, असे सांगत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय कामकाजातून हे विधान वगळले.