हे करून पहा – आले-लसूण पेस्ट राहील वर्षभर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आले-लसूण पेस्टमुळे स्वयंपाकाचा वेळ वाचतो आणि ती अनेक आठवडे टिकवून ठेवता येते.

ही पेस्ट दीर्घकाळ ताजी राहण्यासाठी, आले आणि लसूण धुऊन पूर्णपणे कोरडे करून घ्यावेत, जेणेकरून त्यात अजिबात ओलावा राहणार नाही.

सोललेला लसूण 250 ग्रॅम आणि 150 ग्रॅम आले बारीक पेस्ट होईपर्यंत मिक्सरमध्ये वाटून घ्या.

यामध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्या.

यात मीठ आणि एक चमचा तेल घाला. ही पेस्ट अधिक काळ टिकते.