ज्यांचे स्वत:चे विचार गटारासारखे आहेत त्यांना दुसऱ्यांना बोलायचा अधिकार नाही; विजय वडेट्टीवार यांची कंगना राणावत यांच्यावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी आज जेन-झी तरुणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. ‘जेन-झी पिढीतल्या तरुणी म्हणजे जनरेशन गटर आहेत,’ असे कंगना म्हणाल्या. त्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कंगना यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”ज्यांचे स्वत:चे विचार गटारासारखे आहेत त्यांना दुसऱ्यांना गटार बोलायचा अधिकार नाही” अशा शब्दात वडेट्टीवार यांनी कंगना यांना सुनावले

”ज्यांचे स्वत विचार गटारासारखे आहेत आणि ज्याच्या शब्दांमध्ये इतकी घाण भरलेली आहे, त्याला दुसऱ्याला ‘गटार’ म्हणण्याचा कोणताही अधिकार नाही. एक स्त्री म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, पण त्यांनी एका दुसऱ्या स्त्रीबद्दल आणि तरुणांबद्दल जी भाषा वापरली आहे, ती इतरांचे नाही तर त्यांचे स्वतःचे वास्तव दाखवते. कंगना राणौत यांनी आपल्या पदाची मर्यादा समजून घेतली पाहिजे आणि आपले शब्द जपून वापरले पाहिजेत.” असे वडेट्टीवार म्हणाले.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कंगना यांनी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या जेन-झींना टार्गेट केले आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या हिंदू महिलांबद्दल कंगना म्हणाल्या, त्यांना स्वातंत्र्य हवे, पण जबाबदारी नको असते. माझ्या दृष्टीने त्या जनरेशन गटर आहेत.

‘जेन-झी’ तरुणी म्हणजे जनरेशन गटर ! – कंगना

कंगनांना भाजपमध्येही कोणी गंभीरपणे घेत नाही !

कंगना यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सीजेपी प्रवक्ता सौरव दास म्हणाला, ‘कंगना यांना त्यांच्या पक्षातही कुणी गंभीर घेत नाही. कंगनांपेक्षा कितीतरी पट जास्त काम जेन-झीने देशासाठी केले आहे,’ असे सौरव दास याने सुनावले.