Photo – उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह उपनगरांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, रेनकोट वाटप, दृष्टिहीन, दिव्यांग तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्याशालेय वस्तूंचे वाटप व मोफत आरोग्य शिबीर यांसारखे उपक्रम राबवले. या उपक्रमांना सामाजिक संस्थांसह नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

शिवसेना शाखा क्र. 214 च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. शाखाप्रमुख प्रभाकर पाष्टे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, विधानसभा समन्वयक शिवाजी रहाणे, विधानसभा संघटक सुरेखा उबाळे, संपर्क संघटक लतिका पाष्टे, उपविभागप्रमुख सुजित राणे, समन्वयक किरण बाळसराफ, अनिल गवारकर, नंदा शेलार, अंजली जाईलकर, हेमंत दुधवडकर, किसन सावंत, सिद्धेश जगताप उपस्थित होते.

शिवसेना अंधेरी शाखा क्र. 67 च्या वतीने डी.एन.नगर महापालिका शाळेत दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विधानसभा संघटक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपशाखाप्रमुख अर्चना बच्छाव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख ज्योत्स्ना दिघे, विधानसभा सहसंघटक सरोज बिसुरे, शाखाप्रमुख स्वाती तावडे, उपशाखाप्रमुख जयश्री जानस्कर, दमयंती कवळे, गटप्रमुख सीमा पाटील, उमा मेडीथी, मुख्याध्यापक अरुण माधव, वैशाली मॅडम आदी उपस्थित होते.

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार व कर्मचाऱयांना रेनकोट व लाडू वाटप करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम, नगरसेविका हर्षल मोरे यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. जी/ उत्तर विभाग अध्यक्ष अमित लोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खजिनदार महेंद्र पवार, चिटणीस रामचंद्र लिंबारे, आशीष मोरे, परिमंडळ 2 चे संघटक संजीव परमार, सेव्रेटरी अनिकेत कदम, राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 2 च्या वतीने महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी व सफाई कर्मचाऱयांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शाखाप्रमुख उत्तम परब यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार राजेश पंडय़ा, कार्यालयप्रमुख गजानन गावडे, उपशाखाप्रमुख जयवंत जाधव, सतीश धुळप, ललित वेलोंडे, महेश वेंगुर्लेकर, आतीश बोंडे, गटप्रमुख श्रीकांत राणे, प्रफुल राज, नागेश बोगाम, उपशाखा संघटक वर्षा शाह आदी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्रमांक 153 आणि माँ फाऊंडेशनच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. माजी नगरसेवक अनिल पाटणकर आणि नगरसेविका स्थायी समिती सदस्य मिनाक्षी पाटणकर यांच्या पुढाकाराने आयोजित सोहळा विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून पार पडला. यावेळी विधानसभा सहसंघटक अनिता महाडिक, संदीप गुरव, उमेश करकेरा, योगीता म्हात्रे, पुंदा भोईटे, शशिकांत घाग, मोहन सप्रे, विनय साठले, विनय शेटये, दीपा डावल, कविता यादव, अनिल पटेल आदी उपस्थित होते.

प्रबोधन कुर्ला शाळेत विद्यार्थ्यांच्या सहभागातून जलपूजन सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी पावसाच्या पाण्याचे जलपूजन करून सकल महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्तम पाऊस पडावा व शेतकऱयांची भरभराट व्हावी, यासाठी वरुणराजाची प्रार्थना केली. संस्थेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते डॉ. भाऊ कोरगावकर व विश्वस्त शलाका कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. दरम्यान अक्षत क्रिएशन निर्मित ‘गंध पावसाचा, रंग भाषांचा’ या कार्यक्रमात लेखिका/अभिनेत्री तपस्या नेवे व निवेदिका दीपाली केळकर यांनी कवितांचे सादरीकरण केले.