महाराष्ट्राला  7 हजार 22 कोटींचा अतिरिक्त निधी, केंद्र सरकारकडून कर वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने सर्व राज्यांना 1 लाख 9 हजार  कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरीत केला असून, राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7 हजार 22 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे.

केंद्र सरकारने ही रक्कम 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त दिली आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसेच प्राधान्याच्या लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.