
जगप्रसिद्ध, अतिप्राचीन आणि रहस्यमय नाझ्का लाईन्सचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी उड्डाण केलेले एक छोटे पर्यटक विमान शनिवारी कोसळले. नाझ्का शहराच्या वेशीवर असलेल्या शेतात विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली. या अपघातात विमानातील सर्व 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे जगभरातील पर्यटकांमध्ये आणि पेरूच्या पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या विमानात एकूण 11 प्रवासी आणि 2 विमानचालक (पायलट आणि सह-पायलट) होते. विमानातील सर्व प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये युरोपीय देशांतील पर्यटकांचा समावेश आहे, ज्यात इटली, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांचा समावेश असल्याचे समजते.



























































