
कांदिवलीतील एका निवासी इमारतीच्या पार्किंगमधून वळण घेताच कार कठडा तोडून थेट 25 फूट खाली कोसळल्याची घटना घडली. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात चालकाचा जीव वाचला. मात्र तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत कार पार्किंग परिसरात वळण घेताना दिसते. मात्र पुढच्याच क्षणी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यासारखे दिसत असून कार पार्किंगच्या कठड्याला धडक देत थेट खाली कोसळते. काही क्षणांतच कारचा चक्काचूर होतो.























































