
-
16 ऑगस्टपूर्वी एलपीजी ई-केवायसी पूर्ण न केल्यास गॅस रिफिल बुकिंग आणि सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. पण आता घरबसल्या ई-केवायसी करणे शक्य झाले आहे.
-
प्रत्येक गॅस कनेक्शनची पडताळणी करणे तसेच बनावट किंवा अनधिकृत कनेक्शन रोखणे आणि सरकारी अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे.
-
ग्राहक जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन किंवा गॅस कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन सुविधेद्वारे ई-केवायसी करू शकतात. यासाठी आवश्यक ओळखपत्रांची पडताळणी केली जाते.
-
आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यासह आवश्यक ओळखपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाच्या गॅस कनेक्शनची माहिती अद्ययावत केली जाते.
-
अनेक भागांमधील ग्राहकांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे गॅस एजन्सीकडून फोन कॉल, एसएमएस तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून ग्राहकांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.























































