पालकपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज; चवीसोबतच मिळेल भरपूर पोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिरव्या पालेभाज्या हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. यामध्ये पालकाचा प्रामुख्याने समावेश होतो. पालकमध्ये आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फायबर यांसारखे आवश्यक पोषक तत्व असतात. पालकची फक्त भाजीच नाही, तर त्यापासून अनेक चविष्ट आणि सोपे पदार्थ बनवता येतात. हे पदार्थ नाश्ता, दुपारचे जेवण किंवा हलका स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकतात. पालकाच्या या सोप्या आणि हेल्दी रेसिपीज जाणून घ्या

पालक-बेसन धीरडे
बेसनामध्ये बारीक चिरलेला पालक, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडे मीठ घाला. पाणी टाकून मध्यम पातळ पीठ तयार करा. तव्यावर थोडे तेल लावून धीरडे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. बेसनामधून प्रोटीन आणि पालकामधून फायबर, व्हिटॅमिन्स व मिनरल्स मिळतात. हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

पालक कॉर्न सँडविच
बारीक चिरलेला पालक आणि उकडलेला मका (कॉर्न) एकत्र करा. त्यात थोडी काळी मिरी पूड आणि मीठ घाला. हे मिश्रण ब्राऊन किंवा होल व्हीट ब्रेडच्या मध्ये ठेवून सँडविच मेकर किंवा तव्यावर शेका. पालकामधून व्हिटॅमिन आणि फायबर, तर कॉर्नमधून कार्बोहायड्रेट्स मिळतात. हलक्या स्नॅकसाठी हे योग्य आहे.

पालक व्हेजिटेबल सूप
एका भांड्यात थोडे तेल गरम करून लसूण आणि कांदा परतून घ्या. त्यात चिरलेला पालक, गाजर आणि तुमच्या आवडीच्या इतर भाज्या टाकून पाणी घाला व शिजवून घ्या. भाज्या मऊ झाल्यावर सूप हलके वाटून (Blend) घ्या. यामुळे शरीराला फायबर आणि व्हिटॅमिन्स मिळतात. हे पचायला हलके आणि पोट भरणारे आहे.

पालक आणि चणा सॅलड
एका बाऊलमध्ये उकडलेले काळे/पांढरे चणे आणि बारीक चिरलेला पालक घ्या. त्यात काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबाचा रस, मीठ आणि भाजलेली जिरे पूड घाला. चण्यांमधून प्रोटीन आणि फायबर तर पालकामधून व्हिटॅमिन्स मिळतात. हे झटपट तयार होणारे हेल्दी सॅलड आहे.