
जमीन, घर किंवा इमारत यांसारखी 50 लाख किंवा त्याहून अधिक किमतीची स्थावर मालमत्ता खरेदी करत असेल, तर टीडीएस आकारला जातो.
टीडीएस (TDS) उशिरा कापल्यास किंवा कापलेला टीडीएस सरकारकडे उशिरा भरल्यास आयकर कायद्यानुसार व्याज आणि दंड भरावा लागतो.
टीडीएस न भरणे, उशिरा कापणे/रिटर्न उशिरा दाखल करणे यासाठी वेगळा भुर्दंड पडतो. टीडीएस कापण्याच्या तारखेपासून मिळेपर्यंत दरमहा 1 टक्के व्याज आकारले जाते.
करदात्याच्या फॉर्म 26एएस किंवा एआईएस (AIS) मध्ये टीडीएस वेळ In-reflect होत नाही, ज्यामुळे ज्याचे पैसे कापले आहेत त्याला रिटर्न किंवा रिफंड मिळण्यात खूप त्रास होतो.
टीडीएस कापल्यानंतर तो जमा करण्यास उशीर झाल्यास दरमहा 1.5 टक्के प्रमाणे व्याज द्यावे लागते. रिटर्न वेळेत न भरल्यास, दाखल करेपर्यंत रोज 200 रुपये दंड आकारला जातो.



























































