
रिलायन्स रिटेलच्या ‘स्मार्ट बाजार’ने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा ’फुल पैसा वसूल सेल’ आणला आहे. १२ ते १६ ऑगस्टदरम्यान हा सेल सुरू राहणार असून, या पाच दिवसांच्या विशेष सेलमध्ये किराणा, ताजी फळे, भाज्या, खाद्यपदार्थ, होम केअर, पर्सनल केअर, डेअरी, घरगुती वस्तू आणि फॅशनसह विविध श्रेणींवर ग्राहकांना आकर्षक ऑफर्स आणि बचतीचा लाभ मिळणार आहे.
स्मार्ट बाजाराने ’अधिक खरेदी, अधिक बचत आणि प्रत्येक रुपयाला अधिक मूल्य’ या संकल्पनेवर आधारित विशेष सेलमध्ये ग्राहकांसाठी सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. या पैसा वसूल सेलमुळे रोजच्या गरजेच्या विविध वस्तू एकाच ठिकाणी किफायतशीर दरात मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्मार्ट बाजारच्या वतीने करण्यात आले आहे.






























































