गटनेत्यांच्या बैठकीत शिंदे गटाला जागा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेत आज आसनव्यवस्थेवरून सत्ताधाऱ्यांचे नाराजी नाटय़ पाहायला मिळाले. गटनेत्यांच्या बैठकीत शिंदे गटाला बसायला जागा नव्हती. त्यामुळे चिडून शिंदे गटाचे गटनेते बैठकीतून बाहेर पडले. या मानापमान नाटय़ाची चर्चा आज पालिकेत  रंगली.

महापालिकेत सत्ताधारी भाजप-शिंदे गटातील मतभेद अनेकदा उघड झाले आहेत. आज गटनेत्यांच्या बैठकीतही ते दिसून आले. महापौर दालनात आज गटनेत्यांची बैठक झाली. मात्र गटनेत्यांच्या बैठकीत  शिंदे गटाला बसायला जागा नव्हती. गटनेत्यांसाठी नीट आसनव्यवस्था करण्यात आली नव्हती. या आसन व्यवस्थेवर अमेय घोले यांनी आक्षेप घेतला आणि तडकाफडकी बाहेर पडले.