
ऑस्ट्रेलियाचा टी20 कर्णधार मिचेल मार्शची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे. त्याने ‘द हंड्रेड 2026’ मध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. सनरायझर्स लीड्सकडून खेळताना मार्शने मँचेस्टर सुपर जायंट्सविरुद्ध 23 चेंडूंमध्ये 32 धावा ठोकल्या आणि स्पर्धेत 400 धावांचा टप्पा ओलांडला. यासह तो ‘द हंड्रेड’च्या इतिहासात एकाच हंगामात 400 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला परदेशी फलंदाज ठरला आहे.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रफर्ड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात मार्शने आपल्या छोटया पण स्पह्टक खेळीत पाच चौकार आणि एक षटकार मारला. या खेळीमुळे ‘द हंड्रेड 2026’ मधील त्याच्या एपूण धावा 406 झाल्या.



























































