सेंट झेवियर्सच्या ‘मल्हार’ची आजपासून धूम! तुकाराम मुंढे, इम्तियाज अली साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा बहुचर्चित ‘मल्हार २०२६’ हा आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.

यंदाच्या मल्हारमध्ये ‘प्रतिबिंब: Beyond the Becoming’ ही संकल्पना केंद्रस्थानी असून, कला, संस्कृती, मनोरंजन आणि वैचारिक देवाणघेवाणीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चर्चासत्रांमुळे महाविद्यालयाचा परिसर तीन दिवस विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गजबजणार आहे. महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणाऱ्या ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये विविध क्षेत्रांतील दिग्गज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. चित्रपट निर्माते इम्तियाज अली, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, माजी बॅडमिंटन विश्वविजेती सायना नेहवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अनिश गावंडे आणि पीक टीव्हीच्या संस्थापक प्रियांशी शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे.