असं झालं तर… अनिवासी नागरिकाला वडिलोपार्जित मालमत्ता विकायची आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
How to Repay Your Home Loan Faster Smart Prepayment Strategies

अनिवासी नागरिकाला हिंदुस्थानातील मालमत्ता विकून मिळालेली रक्कम परदेशात पाठवायची असेल तर सर्वप्रथम मृत्युपत्र किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

Tax Clearance Certificate आवश्यक असून मालमत्ता दुसऱया अनिवासी नागरिकाकडून मिळाली असेल तर आरबीआयची मंजुरी आवश्यक असू शकते.

परदेशात जमीन विकून मिळणाऱया रकमेच्या हस्तांतरणावर मर्यादा घालण्यात आली आहे. एका आर्थिक वर्षात NRO खात्याद्वारे जास्तीत जास्त 10 लाख डॉलर्स पाठवता येतात.

मालमत्ता विकल्यानंतर पैसे NRO खात्यात जमा करा, तसेच फॉर्म 15सीए, 15सीबी आणि Repatriation Application अर्ज भरा.

टॅक्स क्लिअरन्स, विक्रीपत्र आणि बँक स्टेटमेंट यांसारखी कागदपत्रे सादर करा. कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी हयातीत असताना जमीन विकावी.