
-
सिबिल स्कोअर कमी असेल, तर ग्राहकांना होम, कार किंवा एज्युकेशन लोन मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपला सिबिल स्कोअर किती आहे, हे घरी बसूनच तपासा.
-
सिबिल स्कोअर ७३० पेक्षा कमी असल्यास बँक कर्ज नाकारू शकते. बँकेकडून कर्ज नाकारले जाऊ नये यासाठी आपल्याला आपला सिबिल स्कोअर माहीत असणे आवश्यक आहे.
-
cibil.com वर जाऊन ‘Get Your Free CIBIL Score’ वर क्लिक करा. नाव, ई-मेल, मोबाईल नंबर प्रविष्ट करून लॉग इन करा. ओटीपीच्या (OTP) मदतीने तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर कळेल.
-
‘भीम’ (BHIM), गुगल पे किंवा फोनपेसारख्या (PhonePe) पेमेंट ॲप्समध्ये सिबिल किंवा क्रेडिट स्कोअरचा पर्याय शोधा. तुमचा मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर आणि ओटीपी टाकताच सिबिल स्कोअर दिसेल.
-
सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवर वर्षातून एकदा स्कोअर विनामूल्य तपासता येतो. सिबिल स्कोअर तपासण्यापूर्वी पॅन नंबरशी जोडलेला फोन नंबर सोबत ठेवा.































































