
एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्सतर्फे ‘हेड अँड नेक सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि हॉस्पिटलचे ब्रँड अॅम्बेसेडर जॉन्टी रोड्स यांच्या हस्ते या नव्या केंद्राचे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे आता अत्याधुनिक शस्त्रक्रिया, उपचार, पुनर्रचना यांसारख्या वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
डोके आणि मानेच्या कर्करोगाचे प्रमाण अत्यंत गंभीर आहे. पुरुष आणि महिलांमध्ये या प्रकारचा कर्करोग वेगाने वाढत असून तंबाखू तसेच सुपारीचे सेवन यामागील प्रमुख कारण मानले जाते. या सर्व बाबी विचारात घेऊन नवीन केंद्रात तोंडाचा कर्करोग, जीभ, थायरॉईड, स्वरयंत्र, लाळेच्या ग्रंथी आणि स्कल-बेस अशा गुंतागुंतीच्या कर्करोगांवर विशेष उपचार केले जातील.
रुग्णाला आजारातून पूर्णपणे बाहेर काढून सामान्य जीवन देण्याच्या उद्देशाने या केंद्राची स्थापना केल्याची माहिती एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्सचे लीड हेड अँड नेक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमित चक्रवर्ती यांनी दिली.






























































