अखेर आंबा घाटातील एसटी वाहतूक सुरू, सकाळची देवरुख लातूर बस घाटातून रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथील रस्त्याला भेगा पडून रस्ता खचला होता. त्यामुळे घाटातील एसटी वाहतूक 9 ऑगस्ट पासून तर मालवाहतूक अवजड वाहने त्याआधीच बंद करण्यात आली होती . वाहनधारक व प्रवाशी, नोकरदार यांचे यामुळे अक्षरशः हाल झाले होते.

याची दखल आमदार किरण सामंत यांच्यासह रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी, बांधकाम सभापती विलास चाळके,रत्नागिरी व कोल्हापूर पोलीस प्रशासन आंबा घाटातील प्रत्यक्ष खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. आज पासून आंबा घाट मार्गे वाहतूक सुरु करण्याचा विभाग नियंत्रक जानराव यांचा आदेश रत्नागिरी वाहतूक विभागाला आल्याने एसटी वाहतूक सुरु करण्यात आली. यावेळी वाहतूक अधिकारी सचिन सुर्वे यांचे सहकार्य लाभले आहे. आंबाघाटात खचलेल्या ओझरे खिंडीतील मार्गांवर एसटी चालक – वाहक यांना वाहन अत्यंत्य सावकाश चाविण्याच्या सूचना देण्यासाठी रत्नागिरी विभागाची मार्ग तपासणी टीमचे सहाय्य्क वाहतूक निरीक्षक गणेश वायदंडे,टीसी सुनील माळी, चालक विश्वास कनवजे, यशवंत मयेकर आंबा घाटातील खचलेल्या ओझरे खिंडीत थांबून आहेत.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल, वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी यांना प्रवासी वर्गाने धन्यवाद दिले.आज देवरुख बस स्थानकातून सकाळी ७-१५ वाजता सुटणारी देवरुख – लातूर एसटी आंबा घाटातून सुखरूप व व्यवस्थित पार झाल्याचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश वायदंडे यांनी सांगितले.