
1949 चा बँकिंग नियमन कायदा सहकारी बँकांनाही लागू असला तरी त्याच्या आधारे एखाद्या उमेदवारास अपात्र ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्र सहकार कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास नाही, असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी मांडले आहे. ज्या कायद्यांतर्गत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे, त्याआधारेच तो एखाद्या उमेदवाराचा अर्ज नाकारू शकतो. उमेदवारी अर्जाची छाननी ही मर्यादित स्वरूपाची असून त्या टप्प्यावर समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारेच ती केली पाहिजे, असे उच्च न्यायालयानेच नमूद केले आहे.





























































