लोकाधिकार समिती महासंघातर्फे तरुणांना इम्पोर्ट-एक्सपोर्ट लॉजिस्टिक्स प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने इम्पोर्ट-एक्सपोर्ट लॉजिस्टिक्स प्रशिक्षणाचा दुसरा वर्ग शनिवारपासून सुरू करण्यात आला.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन येथे या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनिल देसाई व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्ड्सचे पदाधिकारी शंतनू भडकमकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मिहिर भडकमकर, दुष्यंत मुलानी, देवपाल मेनन, तेज कॉन्ट्रॅक्टर, शंकर हळदणकर, मनोहर पटियानी, विनायक अपराज, वीरेन दयाळ, आदेश परब, अजिंक्य हळिज (पाटील), चैताली मेहता उपस्थित होते. प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी दिनेश बोभाटे, उमेश नाईक, शरद एक्के, सुधाकर नर, श्रीराम विश्वासराव, उल्हास बिले, विलास जाधव, गोरखनाथ पवार, संदीप गावडे, किरण शिंदे, शंकर शिंदे व मयूरेश सावंत मेहनत घेत आहेत.

एकूण ५ शनिवारी होणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात प्रत्येक शनिवारी ७ तासांचे शिक्षण तसेच २० दिवस प्रात्यक्षिक प्रशिक्षण अनुभवी मार्गदर्शकांकडून लाभणार आहे.