
हिंदुस्थानचा उगवता सितारा देवदत्त पडिक्कलने आपला दमदार फॉर्म कायम राखत श्रीलंकन गोलंदाजांची पुन्हा एकदा धुलाई केली आहे. त्याने पहिल्या कसोटी शतक ठोकल्यानंतर त्याने आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही धडाकेबाज कामगिरी करत शतक ठोकलं आहे. 168 चेंडूंचा सामना करत त्याने 10 चौकारांच्या मदतीने आपली शतकीय खेळी पूर्ण केली. 193 चेंडूंचा सामना करत त्याने 117 धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत आणून तो बाद झाला.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिल आणि पडिक्कल यांनी तिसऱ्या वेळेसाठी महत्त्वाची शतकी भागीदारी केली. केएल राहुल आणि यशस्वी जयसवाल लवकर बाद झाल्यानंतर या दोघांनी डाव सांभाळला. गिलनेही 50 धावांची आश्वासक खेळी केली, मात्र चहापानाच्या काही वेळ आधी तो बाद झाला.
या मालिकेत पडिक्कलची बॅट सातत्याने तळपत आहे. त्याने पहिल्या कसोटीतही 167 धावांची मोठी खेळी केली होती. त्याच्या या सराव सामन्यातील आणि कसोटीतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. सामन्याचा विचार करता 84.1 षटाकाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 296 धावा केल्या असून ध्रुव जुरेल (07*) आणि साहार जैन फलंदाजी करत आहेत.






















































