अग्निशस्त्र तस्करीप्रकरणी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला दहिसर पोलिसांनी अटक केली. संदीप उपाध्याय असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहे. शुक्रवारी सहायक निरीक्षक इंद्रजित पाटील, राजू नार्वेकर, ऑस्कर कोलासो, चुंगवडीयार, विलास आव्हाड, नीलेश शनवार यांच्या पथकाने दहिसर चेक नाका परिसरात सापळा रचून संदीपला ताब्यात घेतले. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी संदीपला अटक केली.