जगाच्या पाठीवर – मोठी जंगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मनोज देशपांडे

पाऊस पडतो तेव्हाच जंगले वाढतात. ज्या भागात पाऊस पडत नाही, त्या भागात जंगलांची वाढ होत नाही. जिथे भरपूर पाऊस पडतो, तिथे भरपूर झाडे असलेली जंगले तयार होतात. अशा काही मोठय़ा जंगलांची आज माहिती घेऊया.

अमेरिकेतील आमेझानचे जंगल हे जगातील मोठे जंगल आहे. या जंगलानंतर कांगो ब्रेझिन या आफ्रिकेतील कांगो देशातील जंगल येते. पण आमेझानचे जंगल हे कांगो बेझिन जंगलाच्या तीन पट मोठे आहे. त्या खालोखाल आास्ट्रेलियातील आास्ट्रेलियन रिआम हे जंगल येते.

बोर्निओ, सुमात्रा आणि जावा येथे पसरलेले सुंदालँड हे जंगल त्या खालोखाल आकाराने मोठे आहे.
इंडो-बर्मा जंगल हे त्या खालोखाल आकाराने मोठे असे जंगल आहे.

दक्षिण मेक्सिको ते दक्षिण पनामापर्यंत पसरलेले मैसोअमेरिका हे जंगल त्या खालोखाल आकाराने मोठे आहे.