ठाणेकरांचा रिंग रूट मेट्रोला कडाडून विरोध; घोडबंदरवासीयांची स्वाक्षरी मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे शहरांतर्गत वाहतूककोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रूट मेट्रो प्रकल्पाला ठाणेकरांनी कडाडून विरोध केला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आज सकाळी ‘ठाणे अगेन्स्ट इंटर्नल रिंग मेट्रो’ मंचाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत आमच्या दारात रिंग मेट्रो नको… अशी भूमिका घेत या मोहिमेत कलाकार, डॉक्टर, वकील, इंजिनीयरसह विविध क्षेत्रांतील नागरिकांनी सहभागी होत प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवला.

ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रस्ते अरुंद असल्याने विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो तसेच घोडबंदर सेवा रस्त्यांचा मुख्य रस्त्यात समावेश केला जात असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर आधीच परिणाम झाला आहे. या प्रकल्पांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. असे असताना रिंग मेट्रो प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ ठरेल, असा आरोप करत नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून प्रकल्पाला विरोध दर्शविला.

हिरव्यागार पर्यावरणाचा विनाश

एक हजाराहून अधिक नागरिकांनी केलेल्या स्वाक्षऱ्यांवरून ठाणेकरांना अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प नको असल्याचे स्पष्ट होते. हा प्रकल्प म्हणजे नागरिकांच्या पैशांची निव्वळ उधळपट्टी असून त्यासाठी हिरव्यागार पर्यावरणाचा विनाश केला जात आहे, असा आरोप मोहिमेच्या आयोजक अॅड. राधिका राणे यांनी केला.

प्रकल्प लादला जातोय

ठाणेकरांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्यावर हा अनावश्यक प्रकल्प लादला जात आहे. नागरिकांचा ल कशाही मार्गाने व्यक्त झालेला स्पष्ट विरोध प्रशासनाने लक्षात घेऊन प्रकल्पाचे काम तातडीने थांबवावे अन्यथा हे जनआंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी