
टेक कंपनी ओरॅकल जगातील जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. या कर्मचारी कपातीमध्ये हिंदुस्थानातील कर्मचाऱ्यांचीही नोकरी जाण्याची शक्यता आहे. कंपनीने क्लाऊड आणि एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील वाढता खर्च संतुलित करण्यासाठी व आपला खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
कर्मचारी कपातीचा कंपनीच्या अनेक विभागांवर होऊ शकतो. कर्मचारी कपातीची नेमकी तारीख आणि प्रभावित होणाऱ्या कर्मचाऱ्यांची अंतिम संख्या याबाबत अनिश्चितता कायम आहे.































































