साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 06 सप्टेंबर 2026 ते शनिवार 12 सप्टेंबर 2026

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – क्षुल्लक वाद होतील

बुध राश्यांतर, जवळच्या व्यक्ती तुमच्या बाजूने असल्याने संकटे कमी होतील. क्षेत्र कोणतेही असो मनातील गुपित, महत्त्वाचे मुद्दे व्यक्त करताना सावध रहा. नोकरीत क्षुल्लक वाद होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. शुभ दि. 6, 10

वृषभ – प्रगतीची संधी मिळेल

बुध राश्यांतर. तुमच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करण्याची संधी मिळेल. सहकारी, मित्र यांच्याशी तणाव होऊ शकतो. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. धंद्यात वाढ होईल. अनाठायी खर्च टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिमा उजळेल. शुभ दि. 6, 7

मिथुन – उत्साहवर्धक वातावरण

बुध राश्यांतर, तुमच्या क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी कराल. कोणताही कठीण प्रश्न रेंगाळत ठेवू नका. नवीन परिचय होतील. चौफेर उत्साह राहील. बढती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, अधिकार लाभतील. लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 7, 8

कर्क – प्रेरणादायी कालावधी

बुध राश्यांतर, रागावर नियंत्रण ठेवल्यास मोठे ध्येय गाठता येईल. किचकट प्रश्न लवकर मार्गी लावा. नवीन परिचयाचा उपयोग करता येईल. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करा. लोकसंग्रह वाढवा. शुभ दि. 8, 12

सिंह – विचारांना चालना मिळेल

शुक्र राश्यांतर तणाव कमी करण्यास साहाय्य करेल. परिचयात वाढ झाल्याने विचारांना चालना मिळेल. कायद्याला धरून कृत्य करा. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. शुभ दि. 2, 5

कन्या – उतावळेपणा करू नका

शुक्र राश्यांतर दिलासा देणारे. उतावळेपणा, अतिरेक कुठेही नको. कोणतेही भाष्य करताना विचार करा. बुद्धिचातुर्य महत्त्वाचे ठरेल. टीका करू नका. धंद्यात वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समतोल राखून मुद्दे मांडा. शुभ दि. 4, 5

तूळ – तडजोडीचे धोरण उपयुक्त

शुक्र राश्यांतर दिलासा देणारे ठरेल. तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे कामे करता येतील असे नाही. तडजोडीचे धोरण उपयुक्त ठरेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंद्यात चूक करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांकडे दुर्लक्ष नको. शुभ दि. 2, 5

वृश्चिक – चातुर्याचे कौतुक होईल

शुक्र राश्यांतर. नात्यात, मैत्रीत शब्द जपून वापरा. नोकरीत चातुर्याचे कौतुक होईल. कठीण कामे कराल. धंद्यात गुंतवणूक करताना योग्य सल्ले घ्या. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे गाजतील. लोकप्रिय व्हाल. शुभ दि. 8, 12

धनु – नवीन परिचय प्रेरणादायक

शुक्र राश्यांतराने उत्साह वाढेल. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरीत बुद्धिमत्तेचा उपयोग कराल. धंद्यात स्पर्धा वाढेल. वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कीर्तीचा प्रभाव दिसेल. शुभ दि. 6, 12

मकर – व्यवहारात सावध रहा

शुक्र राश्यांतर, आत्मविश्वास वाढवणारे आहे. कला-साहित्यात विशेष काम कराल. अहंकाराची भाषा मात्र दूर ठेवा. तणाव, गैरसमज वाढतील. नोकरीधंदा टिकवा. व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. शुभ दि. 8, 12

कुंभ – परिस्थितीचा अभ्यास करा

शुक्र राश्यांतर मनावरील दडपण कमी कराल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. नोकरीत कठीण कामे करून घ्याल. धंद्यात नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचा अभ्यास करा. तुमचे महत्त्व, पद टिकवून ठेवा. शुभ दि. 6, 10

मीन – अहंकारयुक्त भाषा नको

शुक्र राश्यांतर शारीरिक, मानसिक दडपण वाढवणारे. संमी कृती ठेवल्यास यश मिळवता येईल. अहंकारयुक्त भाषा उपयुक्त ठरणार नाही. नोकरीत तणाव जाणवेल. धंद्यात तत्परता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निरीक्षण करा, अभ्यास करा. शुभ दि. 7, 8