जगाचा नकाशा बदलणार; संयुक्त राष्ट्रांत ठराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगाचा नकाशा लवकरच बदलणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने यासंदर्भात ठराव मंजूर केला आहे. नव्या नकाशात आफ्रिका खंड आधीपेक्षा बराच मोठा तर, युरोप आणि उत्तर अमेरिका तुलनेने लहान दिसणार आहे. भारताचा आकारदेखील पूर्वीपेक्षा थोडा मोठा झालेला दिसेल. प्रत्यक्षात कोणत्याही देशांचे तसेच खंडांचे क्षेत्रफळ बदलणार नाही. भारताने या ठरावाच्या बाजूने मतदान केले, मात्र एकमेव अमेरिकेने विरोधात मत दिले.