
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये तब्बल 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सीएस शेट्टी यांनी दिली आहे. यावर्षी बँकेच्या कारकुनी आणि ऑफिसर केडरसाठी 12 हजार जणांची भरती केली जाईल, असे ते म्हणाले.
आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 12 हजार जागांची भरती केली जाईल. यामध्ये दीड हजार स्पेशालिस्ट आयटी ऑफिसर्सदेखील असतील. मार्च 2026 पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2.45 लाख पेक्षा अधिक होती. बँकेच्या आर्थिक वर्ष 2026 च्या वार्षिक अहवालानुसार 2025-26 स्टेट बँक ऑफ इंडियाने 25 हजार 633 कर्मचाऱ्यांची भरती केली होती. यामध्ये 4 हजार 640 अधिकारी, 19 हजार 340 असोसिएटस आणि 1 हजार 653 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या वर्षीच्या भरतीमध्ये प्रामुख्याने क्लेरिकल आणि
ऑफिसर केडरवर भर राहण्याची शक्यता आहे.





















































