चांदी तीन हजारांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोने प्रति तोळा 1224 रुपयांनी, तर चांदी थेट तीन हजारांनी स्वस्त झाली. या घसरणीनंतर सोने प्रति तोळा 1 लाख 51 हजार 117 रुपये, तर चांदी 2 लाख 30 हजार 913 रुपये किलो झाली आहे. किमती घसरण्यामागे अमेरिकेतील मजबूत महागाईची आकडेवारी आणि मध्य पूर्वेतील संघर्षाने कच्च्या तेलाचे भडकलेले भाव ही दोन मुख्य कारणे मानली जात आहेत.