शिवडीत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शिवडीच्या राजा’च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘पाण्याखालची द्वारका’ हा नयनरम्य देखावा साकारण्यात आला आहे. प्रबोधनकार ठाकरे उद्यान, शिवडी बस डेपोसमोर, शिवडी, मुंबई येथे हा भव्य देखावा उभारण्यात आला आहे.

शिवडीच्या राजाच्या या देखाव्यात गणेशभक्तांना गुजरातमधील गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेली पौराणिक द्वारका अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर अमन विधाते यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी दिली.