
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी आयोजित करण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेट परीक्षेचे सदस्य सचिव यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 41 वी सेट परीक्षा 26 जुलै, 6 सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार होती परंतू विद्यापीठाने परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता 25 ऑक्टोबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.





























































