
अमेरिकेने प्रथमच अंतराळात शस्त्रे तैनात केल्याची अधिकृतपणे कबुली प्रथमच दिली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाचे सचिव ट्रॉय मिंक ही धक्कादायक माहिती देत पृथ्वीच्या कक्षेत अमेरिकेची संरक्षण शस्त्रे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या सैन्य दलाचे आणि उपग्रहांचे शत्रूच्या संभाव्य आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी ही प्रणाली तैनात करण्यात आली आहे. चीन आणि रशियाकडून अंतराळात वाढणाऱ्या लष्करी हालचाली आणि आव्हानांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. ट्रॉय मेन्क यांनी सुरक्षेच्या कारणास्तव या शस्त्रांचे स्वरूप, तंत्रज्ञान किंवा त्यांच्या अचूक स्थानाबद्दल अधिक माहिती देणे टाळले. मात्र, अमेरिकन सैन्याच्या रक्षणासाठी आणि अंतराळातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या ऐतिहासिक कबुलीमुळे जागतिक स्तरावर अंतराळातील लष्करी स्पर्धेला नवे वळण मिळाले आहे.
क्षेपणास्त्रांपासून बचावाची व्यवस्था
अमेरिकन स्पेस फोर्सचे म्हणणे आहे की, रशिया अंतराळालाही युद्धाचा भाग मानतो. तसेच चीनही अंतराळात लष्करी ताकद वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने अंतराळात शस्त्रे तैनात केली असून अंतराळात लष्करी शक्ती वाढवत असल्याचे काबुल केले. गरज पडल्यास, या शस्त्रांचा वापर शत्रूच्या हल्ल्यापासून अमेरिकन सैनिक आणि त्याच्या अंतराळ प्रणालीला वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो, असे अमेरिकेने स्पष्ट केले.





























































