
>> प्रशांत गौतम
प्रतिभावान लेखक-कवी ऐश्वर्य पाटेकर यांची ‘बाई हरत नसते’ ही कादंबरी. ग्रामीण समाजजीवनाच्या पार्श्वभूमीवर स्त्राrच्या संघर्षाचा वेध घेणारी ही कादंबरी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही स्वतचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्त्री ज्या पद्धतीने संघर्ष करते, तिची जिद्द, स्वाभिमान आणि प्रतिकारशक्ती कादंबरीच्या केंद्रस्थानी येते.
कादंबरीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा तीन पिढ्यांचा विस्तीर्ण पट. एका स्त्राrचा व्यक्तिगत संघर्ष मांडताना लेखक त्यामागची सामाजिक रचना आणि तिचे परिणामही तपासतो. ग्रामीण जीवनाचे चित्रण करताना केवळ दारिद्र्य, अडाणीपणा किंवा गावगाड्याचे बाह्य चित्र उभे न करता, त्या जगण्यामागील सामाजिक प्रश्न गांभीर्याने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कादंबरीतील स्त्राr ही परिस्थितीसमोर निक्रियपणे शरण जाणारी नाही. अन्यायाच्या प्रसंगी तिच्यातील प्रतिकार जागा होतो. ‘बाई हरत नसते’ हे शीर्षक त्यामुळे केवळ आशावादी विधान राहत नाही; ते स्त्राrच्या जगण्यातील मूलभूत जिद्दीचे प्रतीक ठरते. शिक्षणाचा अभाव असूनही गरिबीशी दोन हात करण्याची तिची धडपड, लेकरांच्या भवितव्यासाठी घेतलेले कष्ट आणि जुन्या रूढ चौकटींना प्रश्न विचारण्याचे धैर्य या सगळ्यांतून तिचे व्यक्तिमत्त्व उलगडते.
कादंबरीच्या लेखनासाठी लेखकाने विविध गावांमध्ये जाऊन तेथील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधला, जुन्या घटनांचा मागोवा घेतला आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे प्रसंग उभे केले, असे त्यांच्या निवेदनातून दिसते. त्यामुळे कादंबरीतील ग्रामीण वास्तवाला केवळ कल्पनेचा आधार नसून अनुभव, निरीक्षण आणि सामाजिक अभ्यासाची जोड आहे. ‘बाई हरत नसते’ ही एका स्त्राrची कथा असली, तरी तिच्या निमित्ताने असंख्य अनामिक स्त्रियांच्या जगण्याचा आवाज ऐकू येतो. म्हणूनच ‘बाई हरत नसते’ ही केवळ संघर्षकथा न राहता ग्रामीण स्त्राrजीवन, सामाजिक विषमता आणि स्त्राrच्या स्वत्वाच्या शोधाकडे पाहणारी कादंबरी म्हणून वाचता येते.
ही कादंबरी वाचताना कधीकाळी एक भाकर तीन चुलीतील देवा झिंजाड सरांच्या पारू आईचा संघर्ष डोळ्यांसमोर उभा ठाकला. चार मुली व एका मुलाचे संगोपन करताना इंदू आईची झुंज वाचून नकळत अश्रू आवरणे कठीण झाले. परिस्थितीने इंदू आईला खंबीर बनवले. अगणित कष्ट उपसून, वेळप्रसंगी उपाशीपोटी राहून चार मुलींचे लग्न करणे सोपे काम नव्हते.परंतु जिद्द, चिकाटी, मेहनत आणि लेकरांसाठी गरिबीशी लढण्याचे आत्मबळ परिस्थिती देत गेली.
परिस्थिती कितीही बिकट असो, परंतु तिलाही जिद्दीपुढे कधी हार मानावीच लागते. इंदू आईला परिस्थितीने झुंजविले, पण या मातेने हार मानली नाही. कितीवेळा मोडलेले घर उभे केले. आपल्या मुलींवर संस्कार केले. मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले म्हणून आज लेखक प्राध्यापक होऊन नावारूपाला आले. याचे सर्व श्रेय इंदू आईला जाते.संपूर्ण कादंबरी वाचून झाल्यावर काही प्रश्न अनुत्तरित राहिले. दहावी झाल्यानंतरचा ते नोकरी लागल्यापर्यंतचा प्रवास आणि इंदू आईचा थांबलेला संघर्ष, चार बहिणींचे स्वप्न व देवळ्याचे दाजी आणि अंबरमामा यांच्या साक्षीने सुखाचे चांदणे दारी आलेले पाहायला, मिळाले असते तर आनंद झाला असता.
एकंदर परिस्थिती आणि गरिबीचा बाऊ न करता नियतीशी लढा देऊन खंबीरपणे संसाराच्या गाड्याचे जू खांद्यावर घेऊन न हरता बाई जिंकते. कितीही कठीण परिस्थितीत बाई कधीच हरत नसते हे सिद्ध करणारी कादंबरी हे शीर्षक खरे करून दाखवते. प्रत्येक वाचकाने वाचावी अशी ही कादंबरी खिळवून ठेवणारी आहे. या कादंबरीतील परिस्थिती ही जागतिकीकरणाच्या पूर्वीची असल्याने गावाचे सामाजिक, सांस्कृतिक, वर्णन व ग्रामीण बोलीभाषा यांचा वापर हा काळ सुसंगत आहे. भौगोलिक संदर्भ व वर्णन वाचून संपूर्ण प्रसंग पुढे उभे करण्याचे लेखन कौशल्य संवेदनशील आहे. संतू, झिंग्या, पग्या, गण्या, नित्या व दिवड्या ते दहावीचे मित्र या बालमित्रांची मैत्री ही निखळ वाहत्या झऱयासारखी जागोजागी प्रवाहीत करते. मित्रांच्या संगतीत काही क्षण दुःख विसरून आनंद देतात. लेखकाने प्रांजळपणे कुठेही आडपडदा न ठेवता, जे घडले ते सत्य मांडले आहे. भावड्या ते ऐश्वर्यपर्यंतचा प्रवास व संघर्ष निश्चित सोपा नव्हता. तो शब्दात मांडणे कठीण आहे.
लेखक जेव्हा वाचकांसाठी लिहित असतो, तेव्हा तो आपली साहित्यकृती नेमक्या किती वाचकांना आवडले, याचा तो अंदाज घेत असतो. ऐश्वर्य पाटेकर हे प्रयोगशील लेखक आहेत. त्यांनी आपल्या कादंबरीच्या निमित्ताने असा अंदाज समाज माध्यमातून घेतला तेव्हा त्यांनी एक वाचक सर्व्हे केला. तेव्हा त्यांना मौलिक सूचना अभिप्राय प्राप्त झाले. यातील काही प्रातिनिधिक सचित्र प्रतिक्रिया पुस्तकात दिल्या आहेत. त्या विलक्षण बोलक्या आहेत.
बाई हरत नसते
लेखक- ऐश्वर्य पाटेकर
प्रकाशन- पेन पब्लिशिंग हाऊस, पुणे





























































