पेसमेकर शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी व विरार येथील रहिवासी मिलिंद कचर जाधव यांना तातडीने पेसमेकर बसविण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ही शस्त्रक्रिया मुंबईतील बांद्रा येथील लिलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे होणार असून, त्यासाठी 3 लाख 20 हजार 800 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन जाधव कुटुंबीयांनी केले आहे.

मिलिंद जाधव त्यांच्यावर यापूर्वी झालेल्या इतर शस्त्रक्रिया व औषधोपचारांमुळे मोठा खर्च आतापर्यंत झाला आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेचा आणखी खर्च उचलणे कुटुंबाला शक्य होत नाहीये. त्यामुळे मिलिंद जाधव यांच्या शस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी आर्थिक मदत करावी, अशी विनंती त्यांच्या पत्नी वर्षा जाधव यांनी केली आहे. पत्ता: अगरवाल पॅराग्राउंड, चिखल डोंगरी रोड, विरार (पश्चिम), जिल्हा पालघर – 401303. मदत करू इच्छिणाऱयांनी धनादेश थेट रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा करावा. बँकेचे नाव: आयसीआयसीआय बँक. खातेदाराची नाव: लिलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. खाते क्रमांक: 102701002043. आयएफएससी कोड ः ICICI0001027. ब्रँच ः मेहबूब स्टुडिओ. पॅनकार्ड नंबर ः AAATL1398Q. अधिक माहितीसाठी संपर्क ः वर्षा जाधव / चेतन जाधव – 9167047764.