जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधिताला माहीममध्ये अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र दहशतवादविरोधी कक्षाच्या काळाचौकी युनिटने माहीममध्ये धडक कारवाई केली. एक तरुण पाकिस्तानी इंटेलिजंट ऑपरेटर (पीआयओ) च्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने माहीम येथे राहणाऱया मोहम्मद हसन अख्तर (33) याला पकडले. रॅपिडो चालक आणि अत्तर विक्रीच्या नावाखाली तो देशांतर्गंत सुरक्षेला धोका निर्माण होईल असे कृत्य करत असल्याचे त्याच्या मोबाईलमधील धक्कादायक बाबींमुळे समोर आले आहे. तो पाकिस्तान पुरस्कृत ‘आयबीएन ए कासिम’ या टेलिग्राम चॅनेलचा सबस्क्रायबर असल्याचेदेखील आढळल्याचे एटीएसने माहीम पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद केले आहे.