
पोस्ट विभागाच्या नियमांनुसार, तुमची पॉलिसी मॅच्युअर (परिपक्व) होऊन तीन वर्षे झाली असतील आणि तरीही खाते सक्रिय नसेल तर ते फ्रीज केले जाऊ शकते.
त्यामुळे, जर तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर वेळीच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचे व्यवहार थांबवले जाऊ शकतात.
हा नवीन नियम पोस्ट ऑफिसच्या सर्वच लोकप्रिय लहान बचत योजनांना लागू आहे. यामध्ये PPF, एण्एए, NSC, KVP, MIS, TD, RD या योजनांचा समावेश आहे.
तुमचे बचत खाते फ्रीज होऊ नये यासाठी तुमची योजना मॅच्युअर झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत खाते बंद करण्यासाठी अर्ज करा आणि तुमची जमा रक्कम काढून घ्या.
योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर मॅच्युरिटीनंतर खात्याच्या मुदतवाढीसाठी अर्ज करा. योजना मॅच्युअर झाली असेल तर पोस्टात जावून खाते फ्रीज होण्यापासून वाचवा.

























































