अल्पवयीन मुलाला स्पर्शच केला नाही तरीही पोक्सोचा गुन्हा; हायकोर्टाकडून तिघांची खटल्यातून मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
court

अल्पवयीन मुलाशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या तिघा आरोपींना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. मुलाला चापट मारल्याचा आणि त्याच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप अन्य महिलेवर असताना व अर्जदारांनी अल्पवयीन मुलाला स्पर्श केला नसतानाही त्यांच्यावर ‘पोक्सो’चा गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो, असा सवाल करत हायकोर्टाने ‘पोक्सो’ खटल्यातून तिघांची मुक्तता केली.

अल्पवयीन मुलगा घराजवळ उभा असताना सह आरोपी महिलेने मुलाच्या पार्श्वभागावर चापट मारली व आक्षेपार्ह टिप्पणी केली. याप्रकरणी मुलाने घरी माहिती देताच त्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिघा अर्जदारांविरोधात पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. ‘पोक्सो’ खटल्यातून दोषमुक्ततेसाठी अर्जदारांनी ऍड. गणेश गुप्ता, ऍड. साहिल घोरपडे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.