पूर्णेकर हत्याकांड प्रकरण – ठाणे, मीरा रोडमध्ये सर्वपक्षीय कँडल मार्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करणाऱया मास्टर माइंडला त्वरित अटक करा या मागणीसाठी आज ठाण्यातील कोलशेत व मीरारोडमध्ये सर्वपक्षीय कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये शिवसेनेसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

मीरारोडमधील भाजी मार्केट ते शहीद कौस्तुभ राणे स्मारकादरम्यान हा कँडल मार्च निघाला. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय द्या या मागणीचे फलक हातात दिसत होते. भाईंदर पूर्वेतील नवघर नाका येथेही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने 7 नोव्हेंबर रोजी कँडल मार्च काढला जाणार आहे.

आज निघालेल्या कँडल मार्चमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, संपर्कप्रमुख गिरीश विचारे, जिल्हा संघटक नीलम ढवण, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, उपजिल्हाप्रमुख धनेश पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. विक्रम तरे-पाटील, मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे, भाजपचे नगरसेवक सचिन डोंगरे व विशाल पाटील, काँग्रेसचे सिद्धेश राणे आदी सहभागी झाले होते. दरम्यान र्ठीण्यातील कोलशेत गाव येथे काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये पूर्णेकर यांचे कुटुंबीय व स्थानिक भूमिपुत्र सहभागी झाले होते.