शेख हसीना बांगलादेशात परतण्याच्या तयारीत, नवीन पासपोर्ट आणि ओळखपत्रासाठी केला अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी नवी दिल्लीतील बांगलादेश दूतावासाकडे नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र (एनआयडी) जारी करण्याची विनंती केली आहे. त्यांना मायदेशी परतायचे असल्याने त्यांनी अर्ज केला आहे. हिंदुस्थानात आश्रय घेतल्यापासून दूतावासाशी झालेला त्यांचा हा पहिला औपचारिक संपर्क आहे.

हसीना यांना त्वरित नवीन प्रवास कागदपत्रे आणि ओळखपत्रे जारी करण्याची विनंती करणारे एक औपचारिक पत्र नवी दिल्लीतील बांगलादेशच्या कार्यवाहक उच्चायुक्त प्रीती रहमान यांना सादर केले आहे. वकिलांनी त्यांचे बांगलादेशी नागरिकत्व आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांतर्गत बांगलादेश सरकारची कर्तव्ये यांचा हवाला दिला आहे. असे समजतंय की, शेख हसीना डिसेंबरमध्ये बांगलादेशात परत येऊन न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याची योजना आखत आहेत.

सरकारी नोकऱ्यांमधील 30 टक्के स्वातंत्र्यसैनिक आरक्षण प्रणालीच्या निषेधार्थ जून 2024 मध्ये सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे रूपांतर देशव्यापी जनआंदोलनात झाले. यानंतर, शेख हसीना यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास आणि 5 ऑगस्ट 2024 रोजी लष्करी विमानाने हिंदुस्थानात जाण्यास भाग पाडले गेले. त्यांच्या पक्षावर, आवामी लीगवर, बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आली.