अर्धे वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना बूट-मोजे मिळेना, निधी वितरणास राज्य शासनाकडून विलंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्धे शैक्षणिक वर्ष गेले तरी जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बूट आणि मोजे मिळालेले नाहीत. शासनाकडून निधी वितरित करण्यास झालेला विलंब आणि शिक्षण विभागाच्या धीम्या कारभारामुळे हजारो विद्यार्थी या सुविधेपासून वंचित आहेत.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश, बूट आणि दोन जोड मोजे देण्याची योजना राबविली जाते. शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळणे अपेक्षित होते, मात्र सत्राचा अर्धा कालावधी उलटूनही वितरण झालेले नाही. खरेदी प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य पोहोचविण्यास आणखी किमान 10 ते 15 दिवस लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर जिह्यात जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या एकूण 1629 शाळा असून त्यामध्ये 71 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.