अंगणवाडी सेविकांचा ठाण्यात थाळीनाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पेन्शन, ग्रॅच्युईटी, आजारपणात भरपगारी रजा यांसह विविध मागण्यांसाठी बुधवारी शेकडो अंगणवाडी सेविकांनी ठाण्यात थाळीनाद आंदोलन केले. जिल्हा परिषदेवर धडकलेल्या या मोर्चात ठाणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून जवळपास एक हजार अंगणवाडी सेविका हजर होत्या. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष विजपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी सरकारला दिला आहे.