
हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना पायांच्या टाचांना भेगा पडण्याचा त्रास जाणवतो. थंड आणि कोरडय़ा हवामानामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. परिणामी पायांची त्वचा कोरडी, खडबडीत आणि कडक बनते.
पायांच्या भेगा पडू नयेत यासाठी रोज पायांना मॉइश्चरायझर लावा, खूप गरम पाण्याने पाय धुणे टाळा, टाचांची त्वचा कापू नका, कडक स्क्रबने टाच घासू नका, अनवाणी चालणे टाळा.




























































