
>> अरुण
पावसाळय़ात शेवाळ उगवते तसेच बुरशीही मोठय़ा प्रमाणात येते. मोठी बुरशी छत्रीसारखी दिसते. आमच्या लहानपणी पावसात अनेक लाकडी दारांवर किंवा झाडांच्या मोठय़ा खोडांवर अशी छत्रीसारखी बुरशी दिसायची. त्याला ‘कुत्र्याची छत्री’ म्हटलं जायचं. आता तसं का म्हणत त्याची व्युत्पत्ती ठाऊक नाही. कदाचित असंच एक गंमतीचं नाव. पण तो मश्रूमचा एक प्रकार आहे हे नंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र शिकताना समजलं.
मात्र एखादं मश्रूम खरोखरच एखाद्या छत्रीएवढं किंवा खूप मोठय़ा छताएवढं वाढतं का? याचं उत्तर ‘हो’ असं आहे. अशी भलीमोठी मश्रूम किंवा बुरशीची छत्री अथवा ‘हय़ुमोगोस फंगस’ हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा (लार्जेस्ट) सजीव आहे. तर अशी ‘बुरशी’ अथवा ‘कुत्र्याची’ नव्हे तर हत्तीची छत्री शोभेल अशी मश्रूम कुठे सापडतात? ठिकाण आहे अमेरिकेतल्या ओरेगान राज्यातलं माल्हुर नाशनल फारेस्ट हे स्ट्राबेरी माउढन्टनमध्ये आहे. सुमारे साडेतीन किलोमीटर परिसरात पसरलेलं हे मश्रूम साम्राज्य दोन ते आठ हजार वर्षे प्राचीन आहे. अशा मश्रूमचं वजन 3500 ते 8000 टन असतं! (हत्तीचं) हे मश्रूम ‘हनी मश्रूम’ म्हणूनही ओळखलं जातं. विशिष्ट प्रकारच्या म्हणजेच आधी उल्लेखिलेल्या ‘अर्मिलारिया फंगस’चा विस्तार तर तीन-चार चौरस किलोमीटरमध्ये बराचसा जमिनीखाली असतो.
आता बुरशीतील मश्रूमपैकी ‘हय़ुमोगोस फंगस’ तर इतकं उंच वाढतं की, त्याच्या ‘छत्री’खाली चांगली पाचपन्नास माणसं उभी राहू शकतात. ओरेगानच्या नाशनल फारेस्टमध्ये अशी प्राचीन मश्रूम छत्री पहायला लोक गर्दी करतात. अनेक फंगस झाडांवर वाढतात. ती परोपजीवी असतात. त्यामुळे त्या झाडांचा हळूहळू नाश होतो. अशी ‘ब्रिजिओपोरस’ मश्रूम आसामच्या रेनफारेस्टमध्ये आढळतात. ती झाडावर खोडाला चिकटलेल्या मोठय़ापरातींसारखी दिसतात.
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनासार एका महा अशनी आघाताने नष्ट झाले, परंतु त्यांच्याइतकेच जुने काही सजीव आजही पृथ्वीवर आहेत. मोठी बुरशी किंवा ‘मश्रूम’ त्यापैकीच एक. तशा मश्रूमच्या अनेक प्रजातींची लागवड करून ती खाद्यान्न म्हणूनही वापरली जातात. मात्र मश्रूम विषारी नाही ना याची तपासणी केलेल्याच प्रजाती ‘भाजी’ म्हणून खाता येतात. शिवाय ‘आलर्जी’ असलेल्यांसाठी तर ते त्रासदायक ठरतं. त्यांनी त्यापासून चार हात दूर रहावं हेच बरं!


























































