
पुणे न्यायालयासमोर झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदार किवळे याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या त्याला क्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. त्याची प्रकृती गंभीर असली तरी तो उपचाराला प्रतिसाद देत आहे, अशी माहिती ससून रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
या हल्ल्यात मंदार किवळे याच्या शरीराकर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. हल्लेखोरांनी मंदार याच्या दोन्ही हातांकर मोठय़ा प्रमाणात कार केल्याने हातांची हाडे आणि नसा तुटल्या आहेत. यात त्याचा डावा हात पूर्णपणे निकामी झाला आहे. तसेच डोक्याच्या मागील बाजूस तीन कार करण्यात आले आहेत.
























































