जनसंपर्क वाढवा, आगामी निवडणुकीच्या कामाला लागा! राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी सर्व निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागा, लोकांची मने जिंका, माता-भगिनींपर्यंत पोहोचा… त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम राबवा, असे मार्गदर्शन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

राज ठाकरे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आले आहेत. आज सायंकाळी डोंबिवलीतील प्रगती कॉलेजच्या सभागृहात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षबांधणी, आगामी राजकीय व संघटनात्मक नियोजन, स्थानिक प्रश्न आणि निवडणुकीची तयारी यावर चर्चा झाली. आतापासूनच जनसंपर्क वाढवून मतदारांची कामे प्राधान्याने करा, त्यांच्या अडीअडचणीला धावून जा, महिलांसाठी विशेष उपक्रम राबवून त्यांच्याशी संवाद साधा, लोकांचा विश्वास आणि मने जिंका, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. उद्या रविवारी सकाळी १० वाजता कल्याण येथील स्प्रिंग टाइम हॉटेलमध्येही होणाऱ्या बैठकीत राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.