
झारखंडमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित महिला ही आदिवासी समाजातील असून घरून काम करण्याची मुभा असल्याने ती चाईबासात राहूनच काम करत होती. ही घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली असून रात्री उशिरा पोलिसांना याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. या घटनेत 10 आरोपींचा समावेश असल्याचे कळते असून हे सगळे आरोपी फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीला सुरुवात केली आहे.
Jharkhand | A case of gang rape with a software engineer has been reported in Chaibasa on October 20. Police have registered the FIR against 10 accused. SIT has been formed to probe the case. Raids are being conducted to arrest the accused: Chaibasa Police
— ANI (@ANI) October 22, 2022
पीडितेने सांगितलं आहे की 20 ऑक्टोबरला संध्याकाळी ती तिच्या एका मित्रासोबत रस्त्याच्या कडेला उभी राहून बोलत होती. यावेळी 8-10 जण आले आणि त्यांनी या दोघांना मारहाण केली. यानंतर त्यांनी निर्जनस्थळी नेत बलात्कार केला. पीजित तरुणीला रुग्णालयात दाखल केलं असून तिला कोणालाही भेटायची परवानगी नाहीये. पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी सांगितले आहे की, संशयाच्या आधारे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
The victim stated that on the evening of Oct 20, she had gone out with her friend. They were having a conversation on the roadside. Meanwhile, 8-10 people came to them. They first beat up the two, forcefully took the victim woman to a secluded place and raped her: Chaibasa Police
— ANI (@ANI) October 22, 2022



























































